"क्योटो करार आणि हवामान बदल"

हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रसंघाचा आराखडा करार (UNFCCC) हा करार रिओ दि जनेरो येथे १९९२ मध्ये झालेल्या वसुंधरा परिषदेत मांडण्यात आला, तसेच तो ५० राष्ट्रांच्या स्वाक्षरी नंतर २१ मार्च १९९४ रोजी अंमलात आला.

UNFCCC चा मुख्य उद्देश हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी सदस्य राष्ट्रांनी; राष्ट्रीय, प्रादेशिक & आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करावे हा आहे. UNFCCC अंतर्गत महत्वाचा पहिला करार म्हणजे "क्योटो करार" जो १६  फेब्रुवारी २००५ रोजी लागू झाला.


यात राष्ट्रांना अनेक्स-१ & नॉन अनेक्स-१ विभागले होते,
अनेक्स-१: यात विकसित तसेच संक्रमणशील अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचा समावेश होतो. या गटातील देशांची हरितगृह वायू उत्सर्जनसाठी "ऐतिहासिक जबाबदारी" हा करार मान्य करतो. त्यातूनच विकसित राष्ट्रांवर काही बंधने घालण्यात आली.

'ऐतिहासिक जबाबदारी' तत्वातून 'सामूहिक परंतु विभिन्नत्व जबाबदारी' संकल्पनेची निर्मिती झाली. यातून 
अनेक्स-१ देशांना जास्तीचे योगदान देणे बंधन कारक ठरले व चीन-भारतासह नॉन अनेक्स-१ राष्ट्रांना यात सवलती देण्यात आल्या. अनेक्स-१ मध्ये ३७ राष्ट्रांचा समावेश होतो.
त्यातील कॅनडा ने करारातून २०११ला माघार घेतली तर US ने हा करार कधीच मंजूर केला नाही. २०१३ मध्ये अफगाणिस्थान हे १९२ राष्ट्र होते क्योटो करार मान्य करणारे. अनेक्स-१ राष्ट्रांना २००८-१२ या काळात सामूहिक रित्या१९९० च्या अगोदरच्या उत्सर्जनाच्या ५% नी कमी करण्याचे ध्येय यात ठेवण्यात आले
या करारात लवचिक साधनांचा देखील समावेश आहे.
१) उत्सर्जन व्यापार- ज्यात कार्बन क्रेडीट्सच्या माध्यमातून व्यापार केला जातो म्हणजे एखांद्या देशाने त्याला ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी उत्सर्जन केले, तर तो बचत झालेले कार्बन क्रेडिट्स जास्तीचे उत्सर्जन केलेल्या देशाला विकू शकतो.
२) स्वच्छ विकास तंत्र- जे अनेक्स-१ देश स्वतःच्या देशात उत्सर्जन कमी करू शकत नाही, त्यांनी इतर देशातील उत्सर्जन कमी करू शकतील अशा प्रकल्पात गुंतवणूक करण्याची यात तरतूद आहे. तसेच अशा प्रकल्पातून जितके उत्सर्जन कमी होते त्याचे कार्बन क्रेडीट्स गुंतवणूक करणाऱ्या देशांना मिळते.

३) संयुक्त अंमलबजावणी- यात
अनेक्स-१ देश स्वतःच्या देशा ऐवजी दुसऱ्या अनेक्स-१ देशातील उत्सर्जन कमी करू शकेल अशा प्रकल्पात गुंतवणूक करून आपले बंधनकारक ध्येय पूर्ण करू शकतात.


क्योटो करार हा विकसनशील/अविकसित राष्ट्रांकडे झुकलेला होता, तसेच कॅनडा & US सारखे देश त्यापासून दुर राहिल्याने, त्याचा प्रभाव मर्यादित राहीला. त्यामुळे २०१५ च्या COP-२१ मध्ये पॅरिस करार करण्यात आला.

@ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ

Comments