आर्थिक चक्रव्यूव्हात अडकलेली JNU...!


       JNU प्रकरण हे फक्त पैसा किती वाढला, या चष्म्यातून बघणे म्हणजे सगळ्यात मोठी चूक ठरेल. कारण JNU हे सर्व भारताच्या सांस्कृतिक मिलनाचे स्थान आहे. तिथे प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी आहेत. ती एक विचार निर्माण करणारी संस्था आहे, तिला डाव्या किंवा उजव्या मध्ये विभागाने देखील चुकीचे ठरेल. सर्वात महत्त्वाचे ABVP ही उजव्या विचारांची विद्यार्थी संघटना आणि AISF, AISA सारख्या डाव्या संघटना तसेच 'बिरसा आंबेडकर फुले विद्यार्थी संघटना (BAPSA)' यासारख्या मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थी संघटना देखील या शुल्कवाढीच्या विरोधातील आंदोलनात सहभागी आहेत.
        JNU का टिकली पाहिजे कारण तिथे मिळते सर्वांना संधी त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर. तेथील निवड प्रक्रिया खूप चांगल्या प्रकारची आहे. भारतातील काही निवडक संस्था आहेत जिथे अत्यंत काटेकोर पणे आरक्षण सारख्या धोरणाची अंमलबजावणी होते, त्यात JNU अग्रणी आहे. तर मग JNU मध्ये फी वाढल्याने काय होणार तर ज्या वंचित घटकांना फक्त पैश्याचा कमतरतेमुळे संधी मिळत नाही ते डावलले जातील. प्रांजल पाटील या IAS झाल्या तेव्हा देशातील प्रथम अंध महिला IAS म्हणून पोस्ट टाकणार्‍यांनी त्या कोणत्या ठिकाणी शिकल्या याची देखील माहिती काढावी. तसेच त्या जिथे शिकल्या त्या JNU बदल त्यांना काय वाटत ते देखील माहित करुन घ्यावे.

      ती संस्था ज्यांच्या नावाने आहे ते देशाचे प्रथम पंतप्रधान मा. जवाहरलाल नेहरू यांच्या बदल असलेल्या पूर्वग्रहदूषित मानसिकतेने हे केले जात आहे का? याचा देखील विचार झाला पाहीजे. JNU मधील विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की काही प्रयत्न फक्त दिसतात तितके सीमित नसतात त्याचा परिणाम खूप दूरगामी असतो. बाकी JNU मध्ये तेथे वॉचमन चे काम करणारा पुढच्या वर्षी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन सन्मानाने शिकू शकतो अशी ही संस्था आहे.
     JNU लाच का नेहमी लक्ष केले जाते? त्याचे कारण तेथून निर्माण होणार विद्यार्थी हा प्रश्न विचारणारा असतो, हे आहे का ? आपल्याला प्रश्न विचारणारे विद्यार्थी इतके जड का झाले आहे? यातून जर तोडगा काढणे इतके देखील कठीण नाही, त्यासाठी थोडीशी प्रशासकीय आणि राजकीय सक्रीयता आवश्यक आहे. त्यामुळेच या सर्व प्रकारात तुम्हाला ठरवायचे आहे की काय चूक आणि काय बरोबर, कारण न्यूज चॅनेल वर जे काही दाखवले जात आहे त्याच्या पलीकडे विचार करण्याची गरज आज नागरिक म्हणुन आपल्या सर्वांची आहे.

@ ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ 

Comments